Crime: डोंबिवलीत सोन्याची बनावट नाणी देऊन फसवणूक; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सापळा लावून पोलिसांनी एका अटक केली आहे तर दुसरा आरोपी फरार झाला आहे.
Dombivli News
Dombivli NewsSaam Tv

डोंबिवली - दोन कामगार भीमा, कालिया सोन्याची (Gold) बनावट नाणी घेऊन रस्त्यावर फिरायचे. फिरत असताना एखाद्या एका चांगल्या स्थितीमधील पादचाऱ्याला अडवून त्याला आपली पत्नी खूप आजारी आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पण त्यासाठी पैशाची गरज आहे. आमच्या जवळ सोन्याची नाणी आहेत. ही नाणी आमच्या गावाकडील शेतात सापडली आहेत.

ती खूप जुनी आहेत. ती विकून पत्नीच्या आजारासाठी आम्ही पैसे जमविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपण नाणी खरेदी केली तर ते पैसे आम्हाला पत्नीच्या आजारासाठी वापरता येईल असे समोरील पादचाऱ्याला पटवून भीमा आणि कालिया त्या पादचाऱ्याला ती नाणी खरेदी करण्यासाठी भाग पाडत होते.

हे देखील पाहा -

५० हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम ते पादचाऱ्याकडून उकळत होते. पादचारी त्याला भुलून ती नाणी खरेदी करत होता. ती नाणी नंतर जवाहिऱ्याला खरेदीदारांनी दाखविली की ती बनावट असल्याचे उघड होत होते. अशाच प्रकार डोंबिवली मधील आजदे गावातील एका रहिवाशाची गेल्या महिन्यात भीमा, कालियाने फसवणूक केली होती.अशाच प्रकारे तीन महिन्यापूर्वी डोंबिवली पूर्वेतील नेहरु रस्त्यावर कामगार नाक्यावर एका मजूर कामगार नेत्याला दोन भामट्यांनी ७५ हजार रुपयांची सोन्याची विकून फसविले होते.

दरम्यान फिर्यादीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा पोलीस आपला शोध घेत सुरू केला. दरम्यान ही माहिती मिळताच भीमा, कालिया आपल्या मोबाईल मधील सीम कार्ड चार ते पाच दिवसाच्या अंतराने बदलत होते. जेणेकरुन पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे आपणापर्यंत पोहचू नये.

Dombivli News
Sangli Crime: मनपात नोकरीचे आमिष दाखवून दोघांना सहा लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

अशाप्रकारे दोघांनी २५ सीम कार्ड काही महिन्यात बदलली. भामटे सतत सीम कार्ड बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. तांत्रिक माहितीची खातरजमा करत पोलिसांना दोन्ही भामटे विठ्ठलवाडी भागात राहत असल्याचे आढळले. सापळा लावून पोलिसांनी शुक्रवारी भीमा सोळंकी याला अटक केली. अटकेची माहिती मिळताच कालिया फरार झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com