पिंपरी-चिंचवडमध्ये महिला डॉक्टरसोबत 'सेक्सटॉर्शन'

प्रणव पांचाळ या व्यक्ती विरोधात एका 36 वर्षीय डॉक्टर महिलेने गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महिला डॉक्टरसोबत 'सेक्सटॉर्शन'
पिंपरी-चिंचवडमध्ये महिला डॉक्टरसोबत 'सेक्सटॉर्शन'गोपाल मोटघरे

पुणे - डॉक्टर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने या महिलेला व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास भाग पाडल. त्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करण्यात आल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. या प्रकरणात वाकड परिसरात राहणाऱ्या एका उचशिक्ष महिला डॉक्टरने गुजरात मध्ये राहणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रणव पांचाळ या व्यक्ती विरोधात एका 36 वर्षीय डॉक्टर महिलेने गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा -

प्रणव पांचाळ हा गुजरात मधिल वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा गावाचा रहिवासी असून त्याने 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान वेळोवेळी फिर्यादी डॉक्टर महिलेला व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पडलं. त्यानंतर फिर्यादी महिलेचे छायाचित्र व व्हिडिओ इमेल वर वायरल करून प्रणव पांचाळ यांनी फिर्यादी महिलेला ब्लॅकमेल केल आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महिला डॉक्टरसोबत 'सेक्सटॉर्शन'
अबब! हिंगोली वाहतूक शाखेने वसूल केला पंचवीस लाखांचा दंड

फिर्यादी डॉक्टर महिला ही विवाहित असून तिच्या पतीच्या मोबाईल वर देखील प्रणव पांचाळ याने फिर्यादी महिलेचे व्हिडिओ पाठवले आहेत. त्यामुळे या प्रकरणात वाकड पोलिसांनी प्रणव पांचाळ यांच्या विरोधात विनयभंग आणि आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रणव पांचाळ हा परराज्यातील रहिवासी असल्याने त्याला अटक करण्याचा प्रयत्न वाकड पोलीस करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.