संतापजनक! कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार

वर्षभरापासून सुरू होता भयंकर प्रकार
संतापजनक! कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार
संतापजनक! कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कारSaam Tv

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये देखील अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसाअगोदर पुण्यात एका तरुणाने कंपनीत सोबत काम करण्याऱ्या युवतीला स्वयंपाक करण्यासाठी घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना महिलावर अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा-

पुण्यामधील (pune) एका तरुणीला शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याघटनेविषयी पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधामध्ये गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. सचिन बलदेव शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा पंजाब राज्यामधील पटीयाला येथील रहिवासी आहे. आरोपीने २४ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान पीडितेवर अनेकदा बलात्कार करण्यात आला आहे.

संतापजनक! कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार
Nashik : भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून

या प्रकरणी पीडित तरुणीने २४ नोव्हेंबर दिवशी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची एका मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाली होती. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला विविध ठिकाणी घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीने पीडितेला नेहमी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सारखे बलात्कार केले आहे.

पीडित तरुणी बेशुद्धावस्थेत असतानाच, आरोपीने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या हा धक्कादायक प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने अखेर पोलिसामध्ये धाव घेतली आहे. पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com