जरंडेश्वर कारखान्यापासून ते इंधन दरवाढीपर्यंत... अजित पवार आज मनसोक्त बोलले, वाचा सविस्तर

सहकार चळवळ अपयशी ठरली नाही, जिथे मॅनेजमेंट खराब होत तिथे वाटोळं झाले. माझ्यामुळे पेट्रोल-डिझेल भावा वाढले नाहीत. विविध विषयांवर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
जरंडेश्वर कारखान्यापासून ते इंधन दरवाढीपर्यंत... अजित पवार आज मनसोक्त बोलले, वाचा सविस्तर
जरंडेश्वर कारखान्यापासून ते इंधन दरवाढीपर्यंत... अजित पवार आज मनसोक्त बोलले, वाचा सविस्तरSaam Tv News

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. आजपासून राज्यात सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हजेरी लावत तिसरी घंटा वाजवली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना, पुणे मेट्रो यांसह जरंडेश्वर कारखान्याबाबतही भाष्य केले. (From Jarandeshwar factory to fuel price hike ... Ajit Pawar spoke heartily today, read more)

हे देखील पहा -

कोरोनाबाबत अजित पवार म्हणाले की, देशात 100 कोटी लसीकरण झाले त्याचं कौतुक आहे. राज्यात 10 कोटींच्या वर लसीकरण झाले त्यात एकट्या पुणे जिल्ह्यात 1 कोटी 17 लाख नागरिकांचं लसीकरण केलं. पुण्यात कोरोना बाधित दर कमी झाला, मृत्यू दर कमी झाला त्यामुळे पुण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. जिल्ह्यात 75 तास लसीकरण मोहिम राबविली आहे. मागील 15 दिवसांत कोविड लसीकरणात 9 % वाढ झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. सिनेमागृह-नाट्यगृहांबाबत अजित पवार म्हणाले की, आज पासून 50% क्षमतेने थिएटर्स सुरू केली आहे. दिवाळीनंतर कोरोना वाढला नाही तर 100 % क्षमतेने थेटर सुरू करण्याची परवानगी देऊ अस आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पुणे मेट्रो आणि वाहतुक कोंडीबाबत अजित पवार म्हणाले की, पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलासाठी आयआयटी मुंबई आणि सिस्टंरा या आंतरराष्ट्रीय कंपनीचा सल्ला घेतला. आता पुणे विद्यापीठ चौकात फक्त उडाण पुलाचा एकच खांब असणार. काही अडचीणींमुळे टाटाच्या पुणे मेट्रो काम सुरू करण्यास उशीर झाला आहे. मात्र त्या अडचणी दुर झाल्या असून स्वतः मुख्यमंत्री टाटांच्या पुणे मेट्रो उद्घाटनसाठी येणार आहेत. राज्य सरकार टाटा मेट्रोला सहकार्य करण्यास तयार आहे. केंद्र स्तरावरील काही अडचणी असल्यास आम्ही त्या सोडवण्यासाठी टाटा मेट्रोला मदत करू. मेट्रो सारखं काम सुरू करत असताना पैसे पण जमवावे लागतात, मात्र फायनॅशिअल अडचणींमुळे टाटाला मेट्रो काम सुरू करण्यास उशीर होत आहे का हे कळण्यास वाव नाही असं अजित पवार म्हणाले.

जम्बो कोविड सेंटरबाबत अजित पवार म्हणाले की, उद्या पासून पुण्यात आठवडी बाजार सुरू होणार आहे. दिवाळी नंतर जम्बो कोविड सेंटर विषयी आढावा घेऊन निर्णय घेणार आणि जे नागरिकांच्या भल्याचं असेल तसा निर्णय घेऊ. जम्बो कोविड सेंटर सुरू करताना खूप आरोप झाले, काही तशा बातम्या आल्या. केंद्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तिसाठी 50 हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमची तयारी केली आहे, मात्र त्याविषयी अंतिम निर्णय झाला नाही. इतर राज्य कशी तयारी करत आहेत याची आम्ही माहिती घेतली आहे, अंतिम निर्णय झाला की आम्ही माहिती देऊ.

शिरुर बँक दरोडा प्रकरणी अजित पवार म्हणाले की, बॅंकेची रेकी दोन चार दिसव अगोदर झाली आहे. रेकी करत असताना काही संशियत व्यक्तीचे चेहरे दिसत आहेत. बँक दरोडा प्रकरणाचा तपास निश्चितपणे ठराविक काळात होईल. पोलिस खात्याची तर जबाबदारी आहेच, पण बँकाची जबाबदारी आहे असं ते म्हणाले.

समीर वानखेडेंबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, नवाब मलिकंबद्दल मला काही विचारू नका. नवाब मलिक बदल त्यांनाच विचारा. समीर वानखेडेंबद्दल मला विचारू नका. मी पुण्याचा पालकमंत्री आहे, मला त्या बद्दल विचारा. मला नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे

जरंडेश्वर कारखान्यावरुन झालेल्या आरोपांबाबत अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र साखर कारखान्यांबद्दल बऱ्याच बातम्या आल्या, बरंच बोललं गेलं. राज्यातील जनतेला वस्तुस्थिती कळावी. काहींनी आरोप केला, 25 हजार कोटींची भराष्टाचार झाला. 10 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा झाला असे आरोप झाले. साखर कारखाने विकले गेले, आरोप झाले मात्र काही निघालं नाही. जिल्हा सहकारी बॅकेने एकूण 30 कारखाने विकले. राज्य सहकारी बँकेने 30 विकले. कारखाने राज्य सहकारी बँकेने काही टेंडर काढले आहेत, त्यांना 10 साखर कारखाने आणि एक सूत गिरणी 25 वर्षाच्या कालावधीसाठी चालवायला द्यायचे आहेत.

जरंडेश्वर साखर कारखाना मुंबईतील गुरू कंपनीने विकत घेतला, नंतर तो बिव्हिजिच्या हनुमंत गायकवाड यांनी विकत घेतला त्यांना त्यात तोटा झाला. जरंडेश्वरविषयी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबातील लोकांवर आरोप करण्यात आले. सुंदरबन को ऑपरेटिव्ही सोसायटी आहे मुंबईत, त्यांनी जरंडेश्वरविषयी हाय कोर्टात एक याचिका दाखल केली होती. गुरू कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेडने जरंडेश्वर साखर करखान्यासाठी 65 कोटी रुपयांची सर्वात जास्त किंमतीची निविदा भरली. जरंडेश्वरचे मालक मुंबईतील गुरू कम्युनिटी प्रा. लि. आहेत, तुम्ही जाऊन बघा जरंडेश्वर ची 10 हजाराची मेट्रिक टनची कॅपेसीटी आहे, त्यामुळे त्यांना 450 कोटींची लोन सहज मिळू शकते.

ज्यांना वाटते कारखाने नाममात्र दराला गेले, जे आरोप करतात त्यांनी टेंडर भरा. दोन तीन कोटीत कारखाने गेले. सहकार चळवळ अपयशी ठरली नाही, जिथे मॅनेजमेंट खराब होत तिथे वाटोळं झाले. जिथे ऊस पिकत नाही तिथं साखर कारखाने काढले होते. राज्य सरकारने साखर कारखान्याना मदत केली नाही तर राज्य सरकार वर टीका व्हायची. आज आम्ही सत्तेत आहोत, आम्ही राज्य सहकारी बँकेच्या निवडणूक लावू शकतो की नाही,पण आम्ही निवडणूक नाही लावली. आज बँकेवर सर्व व्यवस्थित सुरू आहे. बँक 450 कोटी च्या तोट्यात आहे, पण बँक आज चांगली सुरू आहे.

जरंडेश्वर कारखान्यापासून ते इंधन दरवाढीपर्यंत... अजित पवार आज मनसोक्त बोलले, वाचा सविस्तर
लालबाग मधील इमारतीला भीषण आग, एक व्यक्ती जखमी; अनेक जण अडकल्याची भीती

किरीट सोमय्यांबाबत अजित पवार म्हणाले की, काहींनी तर ऑफिस टाकले आहेत,आरोप करण्यासाठी CA आणि वकील नेमले आहेत. इकडून दौरा तिकडे आणि तिकडून दौरा इकडे सुरू आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ते म्हणाले की, माझ्यामुळे पेट्रोल-डिझेल भावा वाढले नाहीत. भारत सरकारने इंधन टॅक्स कमी केला तर महाराष्ट्र सरकार टॅक्स कमी करण्याबदल विचार करेल. एकुणच आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली रोखठोक मते सविस्तरपणे मांडली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com