Eknath Shinde LIVE updates: उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला ... शिवसैनिक गहिवरले

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Eknath Shinde LIVE updates: उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला ... शिवसैनिक गहिवरले
Eknath Shinde LIVE updatesSAAM TV

उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला ... शिवसैनिक गहिवरले

Summary

एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर वर्षा बंगला सोडला आहे. ठाकरेंनी बंगला सोडल्यानंतर शिवसैनिक देखील गहिवरले

..तर मी या क्षणी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार - उद्धव ठाकरे

उद्धवजी, तुम्ही कारभार करण्यास पात्र नाहीत, असं एकाही आमदारानं समोर येऊन सांगितलं तर, मी या क्षणाला मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी तयार आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, बंडखोरांवर कठोर कारवाई न करण्याची विनंती

एकनाथ शिंदे संध्याकाळी ७ वाजता पत्रकार परिषद घेणार, मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे संध्याकाळी ५ वाजता संवाद साधणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते कमलनाथ आणि संजय राऊत यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाल्याची माहिती

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्याचं या ट्विटवरून दिसतंय. शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची निवड करण्यात आली आहे, सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

मी शिवसेनेशी निष्ठावंत, मातोश्री हेच आमचे घर: आमदार वैभव नाईक 

मी शिवसेनेशी निष्ठावंत आहे. मातोश्री हेच आमचे घर आहे, असं आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचा बंडखोर आमदारांंना अखेरचा इशारा

शिवसेनेने विधीमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटर हेडवरून आज संध्याकाळी ५ वाजता बैठक असल्याची माहिती दिली. मुंबईत या अशा सूचना केल्या असून, बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. शिवसेनेची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. सर्व विधीमंडळ सदस्यांना बैठकीला बोलावले आहे.

सरकार अस्थिर नाही- बाळासाहेब थोरात

मंत्रिमंडळ बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार अस्थिर नाही, असे ते म्हणाले. या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

कॅबिनेट बैठकीत राजकीय चर्चा नाही, सूत्रांची माहिती

मंत्रिमंंडळाची बैठक फक्त ३५-४० मिनिटे झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीत राजकीय मुद्द्यावर चर्चा झालीच नाही, असे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री राजीनामा देणार का? संजय राऊत म्हणाले....

मी सरकार नाही, विधानसभा बरखास्त होण्याच्या मार्गावर असे म्हणालो आहे. शिवसेना अशा प्रसंगातून तावून सलाखून निघेल. अग्निपरीक्षेला सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

एकनाथ शिंदेंच्या बंडावर अजित पवार म्हणाले, नो कॉमेंट्स!

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यात बैठक

मला हर्ट अॅटॅक आलाच नाही, घात करण्याचा डाव; नितीन देशमुख म्हणाले, मी उद्धव ठाकरेंसोबत!

अकोलाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख पुन्हा नागपुरात परतले. माझी तब्येत खराब झाली नव्हती, असा गौप्यस्फोट त्यांनी नागपूर विमानतळावर केला. मला पोलिसांनी दवाखान्यात दाखल केले आहे. माझ्यावर उपचार करण्यात आले. पण मला काही झालं नव्हतं. मला हर्ट अॅटॅक आला नाही. माझा घात करण्याचा डाव होता, असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेत उभी फूट

मुंबई आणि ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. ठाण्यातील ५० आणि मुंबईतील २० नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समजते. याबाबत काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी ही माहिती दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठा निर्णय?

मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी होत आहे. याबाबत महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल, संजय राऊत यांचे ट्विट

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता, विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संजय राऊत यांचे ट्विटद्वारे संकेत. त्यामुळे राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सागर या निवासस्थानी वेगवान घडामोडी

भाजपचे महत्वाचे नेते सागर या निवासस्थानी येण्यास सुरुवात झाली आहे. रावसाहेब दानवे, जयकुमार रावल, प्रवीण दरेकर यांच्यासह गीता जैन देखील पोहोचल्याची माहिती

आदित्य ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मंत्रिपदाचा उल्लेख गायब, राजकीय चर्चांना उधाण

आदित्य ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख गायब झाला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Official Twitter Account Of Aaditya Thackeray
Official Twitter Account Of Aaditya Thackeray SAAM TV

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गुप्तचर यंत्रणेबाबत नाराजी

राष्ट्रवादीच्या बैठकीत गुप्तचर यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील अनेक आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पोलीस संरक्षण असताना ही सगळी मंडळी मुंबईतून गुजरातला गेली तरी गुप्तचर यंत्रणेला थांगपत्ता कसा लागला नाही. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या कारभारावर शंकेला वाव असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस नेते कमलनाथ घेणार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

काँग्रेस नेते कमलनाथ आज शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी साडेबारा वाजता भेट घेणार आहेत. तसंच दीड वाजता शरद पवार यांना वाय.बी. सेंटरला भेट घेणार आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे शिंदे सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला असल्याची माहिती समोर येत असतानाच आता राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेनी मागितली राज्यपालांची वेळ

एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाकंडे सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला असल्याची माहीती समोर येत आहे. शिवाय शिंदे मुंबईकडे येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी CISF च्या सहा तुकड्या मुंबईत दाखल करण्यात आल्या आहेत.

'यापुढील राजकारण बाळासाहेबांच्या विचाराने'; बंडानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया

यापुढील राजकारण बाळासाहेबांच्या विचाराने करणार असल्याची प्रतिक्रिया सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. तर शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही असंही शिंदे म्हणाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com