
Kokan Railway Ganapati Special Train: गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचे वेध आता मुंबईच्या चाकरमान्यांना लागले असून रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी ३१२ गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणरायाचे (Ganapati Festival 2023) आगमन अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशभक्तांना आतापासूनच गावचे वेध लागले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी ३१२ स्पेशल फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
यामध्ये मध्य, कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) २५७ गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या ५५ फेऱ्याही गणेशभक्तांच्या दिमतीला आहेत. १३ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी (Mumbai- Sawantwadi) गणपती स्पेशलला पहिला मान मिळणार आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशभक्तांनी रेल्वेला पसंदी दर्शवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांतून अडथळ्यांची शर्यत पार करण्याऐवजी गणेशभक्तांनी यंदाही कोकण रेल्वेचाच आधार घेतला आहे. गतवर्षी लाखभर चाकरमान्यांनी गणपती स्पेशलने प्रवास करत गाव गाठले होते. यावर्षी यंदाही रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी ३१२ गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.