
सचिन कदम, प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली असून चाकरमान्यांची गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोकणातील चाकरमान्यांचा गावी जाण्याचा प्रवास सुरू झाला असून मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शहरातील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची लगबग सुरू झाली आहे. गणपती उत्सवामुळे महामार्ग, रेल्वे स्थानके, आणि बस स्थानके प्रवाशांनी फुलून गेली आहेत.
कोकणात जाणाऱ्या वाहनांमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. दक्षिण रायगडमध्ये वाहतुक सरळीत असली तरी उत्तर रायगडमध्ये वाहनांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. हौशी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे ही वाहतुक कोंडी झाली असून पोलिस आणि स्वयंसेवकांकडून वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दादर दिवा स्टेशनवर तौबा गर्दी...
महामार्गासोबतच दादर आणि दिवा रेल्वे स्टेशनवरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चाकरमान्यांनी काल रात्रीपासूनच दिवा स्टेशनवर प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे दिवा स्टेशन गर्दीने फुलून गेले आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजर पकडण्यासाठी हे प्रवासी आले होते.
पुण्यातून गावी जाण्यासाठी लगबग...
पुण्याहून कोकण आणि मराठवाड्यात जाण्यासाठीही नागरिकांची बस स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी बस स्थानकांत प्रवाशांनी केली मोठी केली असून गणेशोत्सवासाठी एस टी महामंडळ देखील सज्ज झाले आहे. एस टी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.