युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड वर मोक्का

आठ जणांना मोक्का ठोठावण्यात आला आहे.
युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड वर मोक्का
युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड वर मोक्कासागर आव्हाड

पुणे - पुण्यात Pune पैश्याच्या जोरावर गुन्हे करण्याऱ्या काँग्रेस नेत्यासह आठ जणांना मोक्का ठोठावण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, खंडणी, पठाणी सावकारी, जागा बळकावणे अशा विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या केदार ऊर्फ गणेश गायकवाड Ganesh Gaikwad आणि त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाड Nanasaheb Gaikwad यांच्यासह पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मोक्कादाखल झाल्यनंतर त्यांच्या अनेक बाबी जगासमोर येऊ लागल्या आहेत. पुण्यातील मोठा उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात खळबळ माजवली आहे.

अफाट पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे अनेक दृष्कृत्ये जगासमोर येऊ लागल्या आहेत. राजकीय गुरू रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरून सुनेचा आतोनात छळ करण्यात आला. तुमची सुन औदसा असून पांढऱ्या पायाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे.

हे देखील पहा -

तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाही. त्यामुळे तिला सोडचिठ्ठी दे असा सल्ला ज्योतिषी येमुल याने नानासाहेब गायकवाडला दिला होता. त्याच्या सांगण्यावर सुनेचा आतोनात छळ करण्यात आल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल झाला.

गणेशने आपल्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार स्वत: पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली होती. पतीने अघोरी प्रकाराने ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला असा आरोप महिलेने केला होता.

युवक काँग्रेसचा सरचिटणीस गणेश गायकवाड वर मोक्का
सांगलीकरांची चिंता मिटली; काेयना धरणाचे दरवाजे झाले बंद

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे आणि गणेश गायकवाड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने युवक काँग्रेसमधून गायकवाडची हकालपट्टी करण्यात आली आहे. जो पर्यंत गुन्ह्यातील सर्व प्रकरणाची चौकशी होऊन निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत गायकवाडला सरचिटणीस पदावरून पद मुक्त करण्यात आले आहे. गणेश गायकवाड मात्र फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com