गणेश नाईक प्रकरण; चंद्रकांत पाटील म्हणाले, कोर्टाकडून न्याय मिळेल

"राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही"
सामना हे गल्लीतील वृत्तपत्र झालंय; रश्मी वहिनी तूम्ही संपादक पद सोडलंय का? - चंद्रकांत पाटील
सामना हे गल्लीतील वृत्तपत्र झालंय; रश्मी वहिनी तूम्ही संपादक पद सोडलंय का? - चंद्रकांत पाटील Saam Tv News

- सुशांत सावंत

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या 'पोलखोल यात्रा' रथावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मुंबई महापालिकेतील (BMC) भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून पोलखोल अभियान सुरु करण्यात येणार होते. मात्र, कालरात्री या पोलखोल यात्रा (BJP's Polkhol Yatra) रथावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला व रथाची तोडफोड करण्यात आली.

हे देखील पाहा :

यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याची टीका मविआ सरकारवर (MVA Government) केली आहे. तसेच या हल्ल्याबाबत भाजप सरकारविरोधात भव्य मोर्चा काढणार असून तोडफोड करणाऱ्या गुंडांना अटक करावीच लागेल असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

सामना हे गल्लीतील वृत्तपत्र झालंय; रश्मी वहिनी तूम्ही संपादक पद सोडलंय का? - चंद्रकांत पाटील
वडगाव नगरपंचायतीच्या 11 हजार बांधकामांवर पडणार हातोडा?

भाजपच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आज यशवंत राव चव्हाण सेंटरला पार पडत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारतीय, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानच्या संयोजिका डॉ.मा.शुभा फरांदे पाध्ये यांच्या उपस्थितीमध्ये यशवंत चव्हाण सेंटरला हा सोहळा पार पडला यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

सामना हे गल्लीतील वृत्तपत्र झालंय; रश्मी वहिनी तूम्ही संपादक पद सोडलंय का? - चंद्रकांत पाटील
ऑनलाईन गेम्सचं व्यसन, ६० जणांचं संपलं जीवन!

दरम्यान, राज्यात सध्या भोंग्यावरून सुरु असलेल्या राजकारणाबाबत आणि मशिदींवरील भोंग्याबाबत (Loudspeeker) चंद्रकांत पाटील म्हणाले, मुस्लिमांना मशिदीमध्ये नमाज पडायची असेल तर केवळ त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनाच आवाज ऐकू येईल एवढाच आवाज तिथे असावा. भोंग्यांमुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी मुस्लिम समाजाने घ्यावी असे चंद्रकांत पाटील म्हणाले. लाऊडस्पीकरच्या वादावर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर बंदी ठेवण्याच्या न्यायालयाच्या (Court) निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, रात्री 10 ते 6 लाऊडस्पीकर लावू नये हे जुनेच असून त्यात नवीन असे काहीच नाही.

सामना हे गल्लीतील वृत्तपत्र झालंय; रश्मी वहिनी तूम्ही संपादक पद सोडलंय का? - चंद्रकांत पाटील
Beed : लग्नाळू तरुणांना आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार पकडला!

गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षावर अश्या पद्धतीचे अनेक आरोप झाले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात आरोपांबाबत योग्य ती शहानिशा होईल आणि न्यायालयाकडून नाईक यांना न्याय मिळेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com