
पुणे : नीरा Nira या ठिकाणी कुख्यात गुंड गणेश रासकर याचा अज्ञात २ व्यक्तींनी भर चौकात गोळीबार Firing करून खून करण्यात आले आहे. नीरेच्या भर चौकाजवळ सातारा Satara- पुणे Pune या महामार्गावर सायंकाळच्या वेळेस झालेल्या, या घटनेमुळे परिसरात थरार निर्माण झाला होता. Ganesh Raskar murdered in Chowkdvj97
हे देखील पहा-
याबाबत घटनास्थळी असलेल्या, नागरिकांकडून आणि पोलिसांकडून Police मिळालेल्या माहितीनुसार, रासकर याला फोन करून, बोलावून त्याच्यावर २ जणांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनकडून मिळाली आहे. रासकर याच्यावर चोरी, मारहाण, हत्या यांसह अनेक दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद यापूर्वी झालेली आहे.
मागील काही दिवसांपासून तो नीरा या ठिकाणी राहत होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी अचानक या ठिकाणी भारत शांती यांच्या कापड दुकानाच्या समोरच त्याला अज्ञातांनी गोळ्या मारल्या आहेत. यावेळी रासकर त्याच्या मोटारसायकलवर त्याठिकाणी आला होता. गोळी डोक्याच्या मागील भागास लागल्यामुळे, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी नीरेयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. Ganesh Raskar murdered in Chowkdvj97
परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्याला पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही घटना कळताच जेजुरी Jejuri पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक हे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी उपचारांसाठी शर्थीचे प्रयत्न केले आहे. तसेच, आरोपींचा कसून शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. एखाद्या जुन्या वादामधून रासकर याचा खून झाले असल्याचे व्यक्त केले जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.