अमृता वहिनी घेऊन आल्या 'गणेश वंदना'... (पहा व्हिडिओ)

त्यांनी हे गाणे डॉक्टर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना यांना समर्पित केले आहे.
अमृता वहिनी घेऊन आल्या 'गणेश वंदना'... (पहा व्हिडिओ)
अमृता वहिनी घेऊन आल्या 'गणेश वंदना'... (पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis कायमच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात आपले नवीन गाणे येणार असल्याची घोषणा अमृता फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये केली होती.

त्यांनी केलेल्या घोषणेनुसार अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आगामी गणेशोत्सवानिमित्त अमृता यांचे हे खास गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'गणेश वंदना' असे अमृता फडणवीस यांच्या गाण्याचे नाव आहे. अमृता यांचा हा व्हिडीओ प्रदर्शित झाला असून त्यांनी हे गाणे डॉक्टर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना यांना समर्पित केले आहे. टाइम्स म्युझिक हब या कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला देखील कनेक्ट होईल अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अमृता यांच्या आतापर्यंतच्या गाण्यांप्रमाणे हे गाणे देखील हीट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.देशभरातल्या असंख्य डॉक्टरांनी कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली.

अमृता वहिनी घेऊन आल्या 'गणेश वंदना'... (पहा व्हिडिओ)
जाऊ द्या ना बाळासाहेब, आमदारकीसाठी नाहटांचा आटापिटा!

कोट्यवधी लोकांचा जीव वाचवला. डॉक्टरांना परमेश्वराचे दुसरे रूप मानले वाजते. सण-उत्सव असले तरी ते रुग्णांच्या सेवेसाठी कायम सज्ज असतात. त्यांच्यासाठी अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ समर्पित केला आहे. युट्यूबवर त्यांचे हे गाणे प्रदर्शित झाले असून अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com