Ganeshostav 2023 : कोकणात जाणाऱ्यांसाठी भाजपकडून खुशखबर, मुंबईतून 6 ट्रेन आणि 250 बसेसची सोय करणार

BUS and Train : शुक्रवार, शनिवार आणि रविवारी भाजपकडून या ट्रेन आणि बसेस सोडल्या जाणार आहेत.
Ganpati
GanpatiSaam TV

>> सूरज मसूरकर, मुंबई प्रतिनिधी

Mumbai News :

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. नागरिकांच्या सोईसाठी आता भाजप देखील पुढे आला आहे.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना भाजपने खुशखबर दिली आहे. मुंबईतून भाजप 6 ट्रेन आणि 250 बसेस सोडणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी भाजपकडून या ट्रेन आणि बसेस सोडल्या जाणार आहेत.

Ganpati
MNS Tweet on ST : 'निर्णय वेगवान, गतिमान सरकार' म्हणणारं 'त्रिकुट' करतंय काय? एसटीचा VIDEO शेअर करत मनसेची टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. कोकणी मते वळवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याची चर्चा विरोधी पक्षात होत आहे. मात्र यातून नागरिकांना फायदा होणार आहे.  (Latest Marathi News)

रेल्वेकडून विशेष ट्रेन्स

रेल्वेने दिलेले माहितीनुसार, १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु अप आणि डाऊन ट्रेनच्या एकूण १६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Ganpati
Ganpati Special Trains: गणेशोत्सवासाठी पहिली मेमो ट्रेन दिव्याहून रत्नागिरीकडे रवाना; चाकरमान्यांमध्ये आनंदी आनंद

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ३ गाड्यांच्या डब्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मंगळुरु,एलटीटी ते कुडाळ आणि दिवा-चिपळूण मेमूच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या तीन गाड्यांचे एकूण १६ डबे वाढवण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com