दादर फुलमार्केटमध्ये लोकांची झुंबड, नियोजनाकरिता ना पोलिस ना पालिका कर्मचारी

आजपासून लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्याकरिता गणेशोत्सवामध्ये फुलांची मोठी मागणी
दादर फुलमार्केटमध्ये लोकांची झुंबड, नियोजनाकरिता ना पोलिस ना पालिका कर्मचारी
दादर फुलमार्केटमध्ये लोकांची झुंबड, नियोजनाकरिता ना पोलिस ना पालिका कर्मचारीSaam Tv

मुंबई : आजपासून लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्याकरिता गणेशोत्सवामध्ये फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात तोबा गर्दी केली होती.

फुल मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे माहिती असून देखील इथे कुठल्याही प्रकारच्या पोलिस बंदोबस्त दिसला नाही. किंबहुना महापालिकेचे कर्मचारी देखील या ठिकाणी दिसले नाहीत. आजपासून पुढील १० दिवस गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पण या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे.

हे देखील पहा-

अशावेळेस शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सगळे नियम पाळून राज्यात नागरिकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पण लोकांनी नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसतं आहे. पहाटे ५ पासून नागरिकांनी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक लोकांनी मास्क लावलेला नाही. तर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन करत असताना दिसून येत नाहीत.

दादर फुलमार्केटमध्ये लोकांची झुंबड, नियोजनाकरिता ना पोलिस ना पालिका कर्मचारी
गणपती सोबत एक रोपटे अन् कुंडी भेट! अमरावतीत दिला जातोय सामाजिक संदेश

आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्याकरिता लोक घरातून निघाले आहेत. पण कोविड प्रोटोकॉलचे पालन होताना दिसत नाही. विना मास्क संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरित सार्वजनिक ठिकाणी कोव्हिड नियमांचे कोणतेही पालन होताना दिसून येत नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन Ganpati Special News आज होत आहे. बाप्पा येणार, म्हणून घराघरांत जय्यत तयारीला सुरूवात आहे.

बाप्पाची प्रतिष्ठापना विधिवत व्हावी याकरिता पुरोहितांना बोलावले जाते. यंदा पुरोहितांची आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर महिला पुरोहितांना बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा मान दिला जात आहे. नवी मुंबई, पनवेलमध्ये महिला पुरोहित या क्षेत्रात सक्रिय झाले आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महिला पुरोहितांना प्रतिष्ठापनेकरिता निमंत्रण दिले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com