धक्कादायक ! अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

अंबरनाथमध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली
धक्कादायक ! अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
धक्कादायक ! अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कारअजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (abuse) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (police) तातडीने तपासाची सुत्रे फिरवत ३ आरोपींना (accused) बेड्या ठोकले आहेत. अंबरनाथच्या जीआयपी डॅम (GIP Dam) परिसरामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. (Gang abuse of young girl in Ambernath)

हे देखील पहा-

या घटनेतील पीडित तरुणी ही कल्याणला (Kalyan) राहणारी असून ती अंबरनाथमध्ये एका दुकानात (shop) काम करते. तिचा मित्र हनुमान हिलम हा रविवारी त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्याबरोबर जीआयपी डॅम परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. यादरम्यान हनुमान याने पीडित तरुणीला फोन (Phone) करून जीआयपी डॅम परिसरात बोलावून घेतले होते. तिला आणण्यासाठी हनुमान याने मित्राची रिक्षा देखील पाठवली. तिला समोर बसवून तिघा मित्रांनी दारू पीत तिला घाबरवण्यास सुरुवात केली होती.

धक्कादायक ! अंबरनाथमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
हृदय पिळवटणारी घटना! अखेरच्या श्वास मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान

एवढेच नव्हे तर बिअरची बाटली फोडून, त्या बाटलीने तिला भोसकण्याची धमकी देत तिचा शारीरिक छळ केला आहे. यानंतर हनुमान याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर त्याचे मित्र विश्वास आणि जावेद यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर हादरलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार केली आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत या तिघांना तातडीने शोधून काढले आणि बेड्या ठोकले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.