कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला अटक

ॲमेझॉन कस्टमर सर्व्हीसच्या नावाने सुरु असलेले बनावट कॉल सेंटर रबाळे पोलिसांनी केले उध्वस्त
कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला अटक
कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला अटकविकास मिरगणे

नवी मुंबई - रबाळे पोलिसांनी ऐरोली मधील शिवशंकर हाईट्स या इमारतीत 29 व्या मजल्यावर अनधिकृतरित्या सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा मारत सात जणांना अटक केली आहे. या टोळीने ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिसच्या नावाने अमेरिकेतील नागरिकांना इंटरनेट कॉलद्वारे संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भीती दाखवत त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात मोठी रक्कम उकळत असल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने सदर कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना लुबाडले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईत कॉल सेंटर चालविण्यासाठी लागणारे 10 लॅपटॉप, 2 राऊटर, 8 मोबाईल फोन व 4 हेडफोन असे साहित्य जफ्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे देखील पहा -

ऐरोली सेक्टर-20 मधील शिवशंकर हाईट्स इमारतीतील 29 व्या मजल्यावर काही व्यक्तींकडून बनावट कॉल सेंटर चालविण्यात येत असल्याचे तसेच सदर कॉल सेंटरमधून ॲमेझॉन कस्टमर सर्व्हीसच्या नावाने अमेरिका या देशातील नागरिकांशी संपर्क साधुन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा मारलाअसता यावेळी सदर फ्लॅटमध्ये 7 व्यक्ती ॲमेझॉन कस्टमर सर्व्हीसेस या नावाने बनावट कॉल सेंटर चालवित असल्याचे आढळून आले.

कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला अटक
प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर टोळीतील सदस्य तेथील कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी कॉल व ई-मेलद्वारे संपर्क साधुन त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये इतर व्हायरस किंवा मालवेअर व्हायरस असल्याचे भासवून त्यांचे ॲमेझॉन अकाऊंट हॅक झाल्याची त्यांना भिती दाखवत असल्याचे आढळून आले. तसेच त्यांना अँटी व्हायरस अथवा सेक्युरिटी सर्व्हीस घेण्यासाठी भाग पाडून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डद्वारे अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून पैसे स्विकारत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सर्व लॅपटॉपची तपासणी करुन त्यातील सर्व डेटा ताब्यात घेऊन 10 लॅपटॉप, 2 राऊटर, 8 मोबाईल फोन व 4 हेडफोन असे साहित्य जफ्त केले. तसेच या प्रकरणी पोलिसांनी सदर कॉल सेंटर चालवणाऱ्या सात जणांना अटक केली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com