पिंपरी- चिंचवडमध्ये तुरटीच्या गणेश मुर्ती; गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड

तुरटीच्या गणेश मुर्त्यांसोबत गणेश भक्तांना तुळशीचं रोपटं देखील मोफत वितरित करण्यात येत आहे
पिंपरी- चिंचवडमध्ये तुरटीच्या गणेश मुर्ती; गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड
पिंपरी- चिंचवडमध्ये तुरटीच्या गणेश मुर्ती; गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोडSaam Tv

पुणे: पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनने गणेश भक्तांना जवळपास ३०० गणपतीच्या संपूर्ण तुरटी पासून बनविलेल्या मुर्त्या ऐच्छिक दान तत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. तुरटीच्या गणेश मुर्त्यांसोबत गणेश भक्तांना तुळशीचं रोपटं देखील मोफत वितरित करण्यात येत आहे. यंदा देखील गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्यासाठी बऱ्यापैकी गणेश भक्तानां घरातच मूर्ती विसर्जन करावं लागणार.

अशावेळी नद्यांतील जलप्रदूषण टाळण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशनने तुरटीच्या गणेश मुर्त्या तयार करून गणेश भक्तांना ऐच्छिक दानतत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. तुरटी पाणी शुद्ध करत तसेच तुरटी पाण्यात सहज विरघळत असल्याने उन्नती सोशल फाउंडेशनने खास संपूर्ण तुरटी पासून बनविलेल्या श्रीच्या सुबक आणि आकर्षक मुर्त्या तयार करून वितरित केल्या आहेत.

पिंपरी- चिंचवडमध्ये तुरटीच्या गणेश मुर्ती; गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड
माकडीन आणि तिच्या पिल्लाचा प्रसंग वाचून डोळे पाणवतील

प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या गणपती मुर्त्या या स्वस्त असतात. त्यामुळे गणेश भक्त त्यांना परवडेल अशी प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती आपल्या घरात स्थापित करतात. मात्र या मुर्त्या नद्या किंवा हौदात विसर्जित केल्यानंतर लवकर विरघळत नाही, त्यामुळे बऱ्याचदा गणपती बाप्पाच्या मूर्त्यांची विटंबना देखील होते. असं चित्र प्रामुख्याने आपल्याला मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महानगरात पाहायला मिळतात. त्यामुळे गणेश भक्तांना पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करता यावा म्हणून आम्ही संपुर्ण तुरटीच्या गणपती मुर्त्या नागरिकांना ऐच्छिक दान तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या असं उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी सांगितले.

या मूर्त्यांच्या ऐच्छिक दानातून येणारी रक्कम देखिल आम्ही पुण्यातील मदत फाउंडेशनला देणार आहोत, ज्यामुळे समाजातील आणखी काही गरजवंताना मदत होऊ शकेल असं उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय भिसे यांनी सांगितलं.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com