Ganpati Festival 2023: कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लूट थांबणार! जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी बस चालकांना बसणार चाप...

Mumbai News: कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लूट थांबणार! जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी बस चालकांना बसणार चाप...
Mumbai-Konkan News
Mumbai-Konkan NewsSaam Tv

>> संजय गडदे

News on Mumbai-Konkan Bus Service :

गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. याच काळात खाजगी वाहतूक करणाऱ्या बस चालकांकडून प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जाते.

Mumbai-Konkan News
India Alliance Meeting: दिल्लीत 'इंडिया आघाडी'च्या समन्वय समितीची पहिली बैठक, जागावाटपाबाबत काय झाला निर्णय?

मात्र आता याच बस चालकांच्या मनमानीला आळा बसवण्यासाठी अंधेरी आणि बोरिवली आरटीओने कंबर कसली असून बस चालकांकडून होणाऱ्या लुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लाईंग स्कवॉड तयार केले आहेत. (Latest Marathi News)

त्यांच्या मदतीने प्रवाशांना लुटणाऱ्या बस चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आरटीओने गणेश भक्तांसाठी एक हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी देखील उपलब्ध करून दिला असून जे बस चालक प्रवाशांकडून अधिक पैसे मागतात अशा बसचालकांची तक्रार करण्याचे आवाहन मुंबई प्रादेशिक वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Mumbai-Konkan News
Parliament Special Session: विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षांना अजेंडा सांगणार केंद्र सरकार? बोलावली सर्वपक्षीय बैठक

कुठे कराल तक्रार?

मोबाईल नंबर ८५९१९४४७४७, इमेल mh47autotaxicomplaint@gmail.com या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून परिवहन विभाग बस चालक आणि कंपनीवर मोटर वाहन अधिनियमातील तरतुदी अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com