Ambernath: MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं कठीण

अंबरनाथ या ठिकाणी आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत रासायनिक वायू गळती झाली
Ambernath: MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं कठीण
Ambernath: MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं कठीणअजय दुधाणे

ठाणे : अंबरनाथ या ठिकाणी आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत रासायनिक वायू गळती झाली आहे. गळतीमुळे आसपासच्या परिसरात लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्रास होत असलेल्या ३४ व्यक्तींना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

आज सकाळी १० वाजेच्या सुमारास अंबरनाथ एम.आय.डी. सी. प्लॉट क्रमांक एन/१०/१ या ठिकाणी आर. के. केमिकल कंपनीमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे. सल्फुरिक अॅसिड या केमिकलची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे. गळतीनंतर आजूबाजूच्या परीसरात राहत असलेल्या लोकांना त्रास होऊ लागला आहे. त्यांना श्वास घेणे कठीण होत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ३४ व्यक्तींना तात्काळा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Ambernath: MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं कठीण
भारतीय जवानांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस आणि अंबरनाथ MIDC अग्निशमन केंद्राचे एक फायर वाहन घटनास्थळी पोहोचले आहे. सदर या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून सदर ठिकाणी सल्फुरिक अॅसिड या केमिकलची गळती थांबवण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अंबरनाथ अग्निशमन केंद्रातून देण्यात आलेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.