
- सिद्धेश म्हात्रे
Girish Mahajan : अजितदादांची (ajit pawar) खंत मी समजू शकतो. मात्र मंत्रिमंडऴ विस्तारात महिला भगिनींना योग्य न्याय सरकार आणि आमचे नेतृत्व देणार होते. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने ते होऊ शकलं नाही. ज्याही वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार (mantri mandal vistar) होईल त्यावेळेला सगळा बॅकलॉग भरून काढला जाईल असे मत क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नवी मुंबईत व्यक्त केले.
आज जगभरात जागतिक महिला दिन (womens day) साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याने विराेधक सत्ताधा-यांना खिंडीत पकडत आहेत. याबाबत सत्ताधारी मंत्र्यांना विचारले असता क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. सगळे मार्ग सुकर झाले आहेत. त्यामुळे महिला सदस्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकेल.
भांग की अन्य काेणत्या नशेत बाेलतात
संजय राऊतांबद्दल रोज रोज बोलायला आमच्याकडे शब्द नाहीत. ते रोज भांग मध्ये बोलतात की आणखी कुठला नशा करतात हे आम्हाला माहित नाही. ते कोणत्या नशेत बोलतात हाच खरा संशोधनाचा विषय आहे अशी टिप्पणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
आमची संस्कृती नाही
ते काहीही शिवीगाळ करू शकतात कोणालाही काही बोलू शकतात. ते स्वयंभू आहेत. त्यांना आम्ही मोकळा सोडले त्यांना रोज रोज उत्तर कोण देईल ते ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत बोलणं आमची संस्कृती नाही असेही महाजन यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.