Ex बॉयफ्रेंड ठरत होता अडथळा, मुलगी अन् नव्या प्रियकराने काढला काटा

आरोपी नेहा जाधव आणि प्रेम उघडे यांचे नव्याने प्रेम संबध सुरु होते.
Ex बॉयफ्रेंड ठरत होता अडथळा, मुलगी अन् नव्या प्रियकराने काढला काटा
Pune Crime NewsSaam TV

पुणे: नवीन प्रियकराच्या प्रेमात अडथळा करणाऱ्या जुन्या प्रियकराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चाकण औद्योगीक वसाहतीतील भांबोली परिसरात घडली आहे. भांबोली परिसरातील 19 वर्षीय युवतीने आपल्या नवीन प्रियकर आणि त्याचा भाऊ यांच्या मदतीने जुन्या प्रियकराच्या हत्येचा कट रचला संजय पाटील असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव असून नेहा जाधव असे प्रेयसीचे नाव आहे. आरोपी नेहा जाधव आणि प्रेम उघडे यांचे नव्याने प्रेम संबध सुरु होते या प्रेम संबधीत नेहाचा जुना प्रियकर संजय पाटील अडथळा ठरत होता.

त्यामुळे नेहाने प्रियकर प्रेम आणि त्याचा भाऊ प्रतिक याच्या मदतीने संजय पाटील याला निर्जणस्थळी घेऊन जाऊन डोक्यात दगड टाकून खून केला असुन तिघांवर चाकण पोलीसांत हत्येचा कट रचून खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नेहा जाधवला पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान पुण्यात सध्या हत्येच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नात्यातीलच लोकं आत्महत्येचा बनाव करत नात्यातीलच लोकांना संपवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. प्रेम प्रकरणातून अनेक लोक आत्महत्या करत आहेत. त्याचबरोबर खूनांच्या घटना वाढत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.