Crime News: मुंबईत प्रेयसीला प्रियकराकडून बेदम मारहाण; तरुणीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

Mumbai Crime News: या मारहाणीत त्या तरुणीच्या डोक्याला आणि मणक्याला फ्रॅक्चर झाले असून कमरेच्या खाली देखील तिला खूप मार लागला असल्याने तिला अर्धांग वायू झाला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime News: वसईतील श्रद्धा पालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना समोर आली असतानाच आता मुंबईतील मालाडमध्ये 24 वर्षीय बीएमएम पदवीधर आणि बीपीओ कर्मचारी असलेल्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने शनिवारी क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून मृत्यूशी झुंज देत आहे. (Mumbai Latest News)

Mumbai Crime News
Shraddha Walker Case : 20 हजार लिटर पाणी फ्री, तरीही आफताबला ३०० रुपये बिल; पोलिसांना वेगळाच संशय

बीपीओ कर्मचारी असलेल्या तरुणीला शनिवारी तिच्या प्रियकराने दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील पाणीच्या टाकीजवळ भेटायला बोलावले. तिथे आरोपी प्रियकर अमेय दरेकरने तिला मारहाण (Crime) करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्या तरुणीच्या डोक्याला आणि मणक्याला फ्रॅक्चर झाले असून कमरेच्या खाली देखील तिला खूप मार लागला असल्याने तिला अर्धांग वायू झाला आहे.

यानंतर रविवारी सकाळी आरोपी अमेयने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आपल्या प्रेयसीला मालाड पूर्वेकरील (Malad) तिच्या राहत्या घरी सोडले. यासंबंधीची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात आरोपी अमेयने आपल्या प्रेयसीला मारहाण केली होती.

Mumbai Crime News
सावरकरांवरील आक्षेपार्ह विधान राहुल गांधींना भोवणार? सावरकरांचे नातू तक्रार दाखल करणार

या मारहाणीनंतर रविवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात अमेय आणि त्याची आई राधिका दरेकर यांच्या विरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दहिसर पोलीस ठाणे हद्दीत घडल्यामुळे पुढील चौकशीसाठी प्रकरण आता दहिसर पोलीस ठाण्याकडे सोपवले आहे. मंगळवारी अंधेरी पश्चिमेकडील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये या तरुणीवर सहा तासाहून अधिक काल मणक्याची शस्त्रक्रिया झाली आणि तिच्यावर 14 स्क्रू रोपण करण्यात आले आहेत. तिची प्रकृती गंभीर असून तिच्या डोक्यावर पुढील शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com