एक हजार द्या, बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! धारावीतील धक्कादायक प्रकार

कोविन या सरकारी संकेतस्थळावरही या बनावट प्रमाणपत्राची नोंद होत होती.
एक हजार द्या, बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! धारावीतील धक्कादायक प्रकार
एक हजार द्या, बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! धारावीतील धक्कादायक प्रकार SaamTv

मुंबई : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण (Vaccination) वाढण्यासाठी प्रयत्न करत असताना. धारावीत (Dharavi) मात्र लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची १ हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. विशेष म्हणजे कोविन (Cowin) या सरकारी संकेतस्थळावरही या बनावट प्रमाणपत्राची नोंद होत होती. त्यामुळे या आरोपीने अशा प्रकारे किती जणांना ही बनावट प्रमाणपत्र (Certificate) दिलीआहेत, याचा पोलिस (Police) आता शोध घेत आहेत. याप्रकरणी एका सायबर कॅफे (Cybercafe) मालकाला धारावी पोलिसांनी अटक (Arrested) करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटे दरम्यान धारावीमध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणावर दाटीवाटीच्या असलेल्या या भागात वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आवर घालणे हे मोठे आव्हान मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation) प्रशासनासमोर होते. त्यावर महापालिकेच्या यंत्रणांनी कसोशीने मात केली आणि रुग्णसंख्या शून्यापर्यंत आणली. त्यामुळे‘धारावी प्ररुपाची चर्चा जगभर झाली होती. लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतर देखील धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. या धारावीत बनावट लसीकरणाचे नवे प्ररूप उभे राहिले आहे. अवघ्या १ हजार रुपयांत लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एकही दिवस मुंबई (Mumbai) बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

एक हजार द्या, बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! धारावीतील धक्कादायक प्रकार
...म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून; पुण्यातील धक्कादायक प्रकार

धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडून हे प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सेकारन फ्रान्सिस नाडर (वय- ३६) हा सायबर कॅफे मालक अवघ्या एक हजार रुपयांमध्ये कोरोना लसीच्या मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पुरवत होता. पोलिसांनी एका ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले. नाडरने त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला धारावी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com