राज ठाकरेंना Z दर्जाची सुरक्षा द्या, मनसे नेत्याची मागणी (पाहा Video)

'राज ठाकरेंना सातत्याने धमक्या येत असतात या बाबतची माहिती आम्ही बऱ्याच महिन्यांपासून राज्यसरकारला गृहखाते, पोलीस आयुक्त आणि DG यांना देत होतो.'
Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV

रुपाली बडवे -

मुंबई : राज ठाकरेंना (Raj Thackeray) सातत्याने धमक्या येत असतात या बाबतची माहिती आम्ही बऱ्याच महिन्यांपासून राज्यसरकारला गृहखाते, पोलीस आयुक्त आणि DG यांना देत होतो. मध्यंतरी राज्य सरकारने त्यांची झेड सिक्युरीटी (Z Security) काढून घेतली होती. त्यावेळी मी आमच्या पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना स्वतःच्या सहीचे पत्र घेऊन भेटलो असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ' एकंदरीत राज ठाकरे यांचा धोका पाहता त्यांची सुरक्षा काढून घेतली होती ती पुन्हा द्यावी त्यावेळी सकारात्मक भूमिका गृहमंत्र्यांनी घेतली होती. परंतु आज २ महिने होऊन गेल्यावर पण त्यावर काही झालं नाही. गुढीपाडव्याला जेव्हा राज ठाकरे यांनी आपली जी भूमिका मांडली . भोंग्यांविषयी मांडलेल्या भूमिकेमुळे देशात आणि राज्यात सामाजिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना काल पासून सोशल मीडिया (Social Media) वर प्रचंड धमक्या येणे सुरू झाले आहे.

त्याचसोबतच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या संघटनेकडून धमकी आलेली आहे. त्यामुळे आजच पत्रक तयार केले आहे ते पत्र पोलीस आयुक्त डिजि गृहमंत्री आणि इंटेलिजन्स ब्युरो यांना देणार आहे. सोबतच केंद्र सरकारला आणि अमित शहा यांना देखील पत्र देणार आहे. राज्य सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी त्याच बरोबर राज ठाकरेंसोबत त्यांच्या कुटुंबियांना देखील सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करणार असल्य़ाचंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

तसंच मुंब्रा सारख्या ठिकाणी जर चिथावणी खोर भाषण करणार असाल तर आम्ही पण हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. केंद्र सरकार आणि राज्यसरकारने त्वरित या प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करावी असही ते म्हणाले. दरम्यान, नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तांनी जो निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयावर राज्यसरकार बैठक घेणार असून या बैठकीत काय निर्णय होतंय हे पाहू, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. उच्चन्यायालयाचा सन्मान राखून या सगळ्यांनी आपले भोंगे खाली उतरवले पाहिजे नाही उतरवले तर आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत असा पुन्हा एकदा त्यांनी इशाराही दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com