Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग होणार सुसाट, वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

Mumbai-Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग होणार सुसाट, वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune ExpresswaySaam TV

Mumbai Pune Express Way: सध्या शाळांना सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळेमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता बोरघाट परिसरात वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे.

या सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता मात्र मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पोलिसांनी तोडगा काढला आहे. काय नेमक्या उपाययोजना केल्या आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Latest Marathi News)

Mumbai-Pune Expressway
Monalisa Latest Photos : चाळिशीतही मोनालिसाच्या सौंदर्याला तोड नाही

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. त्यामुळे आता चारचाकी वाहनांची संख्या द्रुतगती महामार्गावर वाढली की अवजड वाहनांना गोल्डन अवर्स सुरू करण्याचा निर्णय आता पोलिसांनी घेतला आहे.

अवजड वाहनांना रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत सदरची वाहने त्या दिशेने प्रवास करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवली जात आहेत.

Mumbai-Pune Expressway
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

वाहतूक कोंडी फोडण्याकरिता गोल्डन अवर्स करून अवजड वाहनाचे प्रमाण घाटामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच हलक्या वाहनांचे प्रमाण जास्त होताच ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न बोरघाट पोलिस वाहतूक केंद्राकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com