Ganpati Special Train 2023: कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; मध्य रेल्वे गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार

Konkan Special Train 2023: रेल्वेचं तिकीट बुकिंग फुल्ल असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. अशातच कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Good News for kohapur and kokakn citizens central railway decided to run ganpati festival special train 2023
Good News for kohapur and kokakn citizens central railway decided to run ganpati festival special train 2023 Saam TV

Ganpati Special Train 2023

राज्यासह देशभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आजपासून म्हणजे १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरूवात होणार असून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणपती मंडळे सज्ज झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या देखील अधिकच आहे.

मात्र, रेल्वेचं तिकीट बुकिंग फुल्ल असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. अशातच कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी एक विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Good News for kohapur and kokakn citizens central railway decided to run ganpati festival special train 2023
Weather Alert: राज्यासाठी पुढील 4 दिवस महत्त्वाचे; या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD अलर्ट

या स्पेशल ट्रेनचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात जाणाऱ्यांसाठी होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून २३ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी एक विशेष गाडी सोडली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. मात्र, ही गाडी कोल्हापूरवरुन मुंबईला परत येणार हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या स्पेशल ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

कारण, कोकणात जाणारे प्रवासी या विशेष ट्रेनमधून (Special Train) कोल्हापूरपर्यंत या ट्रेनने प्रवास करून तिथून एसटी बस किंवा अन्य वाहनांद्वारे कोकणात जाऊ शकतात.गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन शनिवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी CSMT वरून सुटेल.

ही स्पेशल ट्रेन सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूरमध्ये पोहोचेल. मुंबईहून सुटणारी ही गाडी दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले स्थानकांवर थांबेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com