Pune Dam Level: पुणेकरांसाठी खुशखबर! धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; पाणीकपातीचं संकट टळणार का?

Pune Dam Water Level: पुणे विभागातील धरणांत ७७.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
Good News For Pune Citizens panshet and varasgaon dam 100 percent filling Pune Dam Water Level latest updates
Good News For Pune Citizens panshet and varasgaon dam 100 percent filling Pune Dam Water Level latest updates Saam TV

Pune Dam Water Level News Today

ऑगस्ट महिन्यात राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन केलं. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी मिटला आहे. अगदी दोन तीन दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुणे विभागातील धरणांत ७७.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.  (Latest Marathi News)

Good News For Pune Citizens panshet and varasgaon dam 100 percent filling Pune Dam Water Level latest updates
बोलून मोकळं व्हायचं...! मराठा आरक्षणासंबंधी पत्रकार परिषदेआधीचा CM शिंदे-फडणवीस-पवार यांचा VIDEO व्हायरल

पुणे विभागात एकूण ३८ धरणे असून या सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमता ही ४०८.२२ टीएमसी इतकी आहे. यावर्षी पुणे विभागातील धरणांमध्ये एकूण ३१७.७२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. आनंदाची बाब म्हणजे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.

पुणे शहराला (Pune News) खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांमध्ये सध्या २७.४२ टीएमसी पाणी म्हणजेच ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असला तरी, त्यात समाधानकारक वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात पुणे विभागात जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पहिल्याच पावसात धरणक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच पाण्याअभावी पिके जळू लागल्याने बळीराजाची चिंताही वाढली होती.

दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने खरीपाची एक पाणीपाळी सोडण्यासही शासनाने नकार दिला होता. त्यामुळे बळीराजा हा पावसावरच अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. वरसगाव आणि पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणांमधून ६०० क्युसेक वेगाने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.

पुण्यातील प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा

वरसगाव धरण: ९९.५५ टक्के

पानशेत धरण: १०० टक्के

खडकवासला धरण: ५३.१२ टक्के

पवना धरण: १०० टक्के

उजनी धरण: २२.६० टक्के

कोयना धरण: ८२.५१ टक्के

Edited by - Satish Daud

Good News For Pune Citizens panshet and varasgaon dam 100 percent filling Pune Dam Water Level latest updates
Maharashtra Political News : अजित पवार गटाचं X अकाउंट सस्पेंड का झालं?; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं कनेक्शन उघड

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com