
Mumbai Dams Water Level News Today: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांपैकी ४ तलाव शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पाणीकपातीचं संकट देखील टळलं आहे. (Latest Marathi News)
मुंबईला तानसा, मोडक सागर, भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार व तुळशी या ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दिवसागणिक मुंबईला ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.
यंदा जुलै महिन्यातील पहिल्याच पावसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. यातील ३ तलाव काठोकाठ भरले होते. मात्र, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली. त्यामुळे धरणक्षेत्रात जमा झालेला पाणीसाठा झपाट्याने कमी झाला.
त्यामुळे मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणीकपातीचं संकट घोघावण्याची दाट शक्यता होती. मात्र, गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा ९६.२० टक्क्यांवर पोहचला आहे.
यातील तुलसी, विहार, तानसा आणि मोडकसागर तलाव हे चारही तलाव ओव्हरफ्लो झाले असून तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे मुंबई शहरांवरील पाणीसंकट सध्या तरी दुर झाल्याचं दिसून येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील सातही तलावात ९८.१७ टक्के इतका पाणीसाठा होता.
अप्पर वैतरणा धरण ८७.१३ टक्के पाणीसाठा
मोडकसागर आणि तानसा १०० टक्के जलसाठा
मध्य वैतरणा ९७.६१ टक्के जलसाठा
भातसा ९७.०५ टक्के पाणीसाठा
विहार आणि तुलसी १०० टक्के पाणीसाठा
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.