आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात; नाव न घेता पवार कुटुंबावर टीका

काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाही
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी पक्षाला विशेषत: पवार कुटुंबीयांना पुन्हा लक्ष्य केले आहे. काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाही आहे. बहुजनांनी यांना मुजरा करत दादा साहेब-युवराज करत राहवं, म्हणजे तुमची जास्तीत जास्त जिल्हापरिषदेवर बोळवण होईल. हा डाव आपण ओळखला पाहिजे असा टोला देखील त्यांनी यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांना नाव न घेता लगावला आहे.

हे देखील पहा -

विधान भवनात प्रवेश करताना हाती झेंडा घेतला होता परंतु त्यांना गेटवरच अडवण्यात आले. याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले की, पानिपतच्या पराभवानंतर स्वराज्याचा भगवा पताका थोरले सुभेदार मल्हाराव होळकर यांनी खांद्यावर पेलला. पानीपतच्या पराभवाचं रुपांतर त्यांनी प्रभावात केलं. मुघलशाही आपल्या टाचेखाली घेतली, जिथं 'मल्हार आया भागो' म्हणत मुघलांच्या सैनिकांची भांबेरी उडायची, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ताकद अटकपासून कटकपर्यंत पसरवली. प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरांचा दैदिप्यमान इतिहास पुसायची मोहिम चालवली. ते तुम्ही वाफगावच्या किल्ल्यावरून ओळखलेच आहे. हा संघर्षाचा पराक्रमाचा इतिहास जर आम्हा बहुजन बांधवाना परत कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आम्ही आमचा राजकीय हक्क मागायला येऊ असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहे.

Gopichand Padalkar
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धपकाळाने निधन

होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त आपण सर्व बहुजन धनगर भटक्या ओबीसी बांधवांनी आपला राजकीय न्यूनगंड झुगारून आपला अधिकार घेण्याचा प्रण केला पाहिजे.ओबीसी भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काचं, ओबीसी आरक्षणाचं, महाज्योतीचं कुणी पानिपत करणार असेल तर आपण सुभेदार बनून उभे राहूया. एकत्र लढूया, एकत्र जिंकूया असे देखील गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com