Video: ...म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांचा हल्ला

आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे.
Video: ...म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांचा हल्ला
...म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांचा हल्लारामनाथ दवणे

रामनाथ दवणे

मुंबई: आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात काही ठिकाणाहून प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी भाजप कडून बंदला विरोध करण्यात येत आहे. तसाच या बंदवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. काकांचं दु:ख सतावत असल्यानेच महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे... अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आज गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारवर हा हल्लाबोल केला आहे. मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण मा. पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करतायेत.आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत. त्याचचं पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आणि आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी ते क्षमतापूर्ण आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील.

जनाब राऊत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला;

पण जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे. याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.