Bhagat Singh Koshyari | राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने नवा वाद; 'गुजराती लोक मुंबईतून गेले, तर...'

'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. आज, शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी केली आहे. ( bhagat singh koshyari News In Marathi )

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. या चौक नामकरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.

Bhagat Singh Koshyari
'एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाही, तर...'; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या सोहळ्यात म्हणाले,'गुजराती, राजस्थानी निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये,बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो.

'भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे. त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा'.

Edited by - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com