Mumbai : 'देश एकसंध ठेवण्यात केरळचे मोठे योगदान' राज्यपाल भगतसिंग कोशारींचे प्रतिपादन, मल्याळी भाषिकांंनाही मराठी शिकण्याचा दिला सल्ला

केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५वा वार्षिकोत्सव मुंबईत पार पडला. अंधेरीतील कॅनोसा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हजेरी लावली होती.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Saam tv

Mumbai: केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५वा वार्षिकोत्सव मुंबईत पार पडला. अंधेरीतील कॅनोसा सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह लोकप्रिय मल्याळी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते रेंजी पणिकर, केरळ ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष बाबू वर्गिस, महासचिव सायमन वर्की, निमंत्रक बिनु चंडी, ख्रिस्ती धर्मगुरू तसेच परिषदेचे सदस्य तसेच निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील केरळी समाजाने देखील मराठी भाषा शिकली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. (Mumbai News)

Bhagat Singh Koshyari
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत फक्त महिलाच दिसणार; पाहा काय आहे कारण?

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी केरळ ख्रिश्चन कौन्सिलचा ६५वा वार्षिकोत्सव अंधेरीतील कॅनोसा सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, असं आपण आपल्या उत्तराखंड राज्यातील लोकांना नेहमीच सांगत असतो. तसेच मुंबईतील केरळी समाजाने देखील मराठी भाषा शिकली पाहिजे," असे मत व्यक्त केले आहे.

"भारतीय भाषा देशाला जोडण्याचे महत्वाचे काम करतात. त्यामुळे प्रत्येकाने मातृभाषेतील शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

Bhagat Singh Koshyari
Accident News: काकाची भेट घेवून निघालेल्या पुतण्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी "सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत झाल्यास इतर भाषा शिकणे सुलभ होते, असे सांगून आपण राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यातील सर्व दीक्षांत समारोह मराठी भाषेतूनच संचलित करण्याचा दंडक घालून दिला आहे," असे प्रतिपादन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com