
मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Governor Bhagat Singh Koshyari News)
राज्यपाल यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील पाहा -
दरम्यान, सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. मात्र राज्यपाल यांना कोरोनाची लागण झाली आहे आहे त्यामुळे शिंदे आता नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनके राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारला किमान सात दिवसांचा अवधी मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.