राज्यपालांना कोरोना निर्बंधांचा विसर? सत्कारावेळी स्वत: काढला मास्क

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड या ठिकाणी 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले
राज्यपालांना कोरोना निर्बंधांचा विसर? सत्कारावेळी स्वत: काढला मास्क
राज्यपालांना कोरोना निर्बंधांचा विसर? सत्कारावेळी स्वत: काढला मास्कअश्विनी जाधव केदारी

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड या ठिकाणी 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली आहे. यावेळी कार्यक्रमात स्पर्धकांचा सत्कार करताना, राज्यपाल कोश्यारी यांना कोरोना निर्बंधाचा विसर पडल्याचे दिसले आहे.

एकीकडे सरकार मास्क लावा, म्हणून सांगत असताना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात कोश्यारी यांनी स्वत: स्पर्धकाचा मास्क काढला आहे. यामुळे पुणेकरांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. शुक्रवारी सकाळी कोथरूडमध्ये सायकल रॅलीच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सहभागी झाले आहेत. राज्यपालांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

रॅलीत सहभागी होणाऱ्या निरुपमा भावे या सायकलपटूचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला आहे. त्यावेळी फोटो काढताना, राज्यपालांनी चक्क भावे यांचा मास्क स्वतःच्या हाताने काढला आहे. यामुळे उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. वास्तविक कोरोना संकटात सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आहेत. सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येवर मर्यादा आहेत. त्यात देखील कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

तोंडावर मास्क लावणे, हा कोविड काळातील मूलभूत नियम झाला आहे. अशावेळी राज्यपालांनी एखाद्या नागरिकाचा मास्क स्वतःच्या हाताने काढणे, ही कृती कितपत योग्य आहे अशी चर्चा पुणेकरांमध्ये चांगलीच रंगली आहे. सायकल रॅली ही एका दिवसाकरिता नसून ती अविरतपणे चाली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणा बरोबरच नवीन पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळण्यास मदत होते.

राज्यपालांना कोरोना निर्बंधांचा विसर? सत्कारावेळी स्वत: काढला मास्क
Mankhurd Fire : मुंबईतील मानखुर्दच्या भंगार गोदामाला भीषण आग

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडी दाखवून, शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपाध्यक्षा प्राध्यापक मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे आणि सायकलपटू उपस्थितीत होते. सायकल रॅलीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यावर देश- विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा करण्यात आला आहे. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्याकरिता उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com