जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून राज्यपालांचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष वाढण्याची शक्यता
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून राज्यपालांचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
राज्यपालांचा ३ दिवसाचा मराठवाडा दौरा Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई : एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा (Shivsena) विरोध असताना फ्रान्सच्या नवनियुक्त वाणीज्यदूत बरोबर या बाबत राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) आज चर्चा केली. फ्रान्सचे नवीन वाणिज्यदूत यांनी आज राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे फ्रान्स आणि भारतातील उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल अशी भूमिका वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी राज्यपालांसमोर मांडली आहे.

हे देखील पहा-

एकीकडे राज्यातील सरकारमधील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना जैतापूर प्रकल्पाला विरोध करत असताना त्याप्रकरणी राज्यपाल फ्रान्सच्या वाणीज्यदूतांशी चर्चा केल्यामुळे राज्यपाल शिवसेनेला डिवचण्याची भूमिका घेत असल्याची चर्चा होत आहे.

राज्यपालांचा ३ दिवसाचा मराठवाडा दौरा
चाकूचा धाक, मुलीला ठार मारण्याची धमकी नंतर नेलं लॉजवर अन्...

राज्यात महाविकास आघाडी सरकार (State Government) आल्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष सुरु आहे. त्यात विशेषतः शिवसेनेबाबत राज्यपाल भूमिका पण चर्चेत राहिली आहे. नुकतेच राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेऊन राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी जैतापूरचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केलाय. यावरून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष होण्याची शक्यता आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com