Accident News: वरातीत नाचता नाचता हॉस्पिटलमध्ये पोहले; नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले

लग्न समारंभात झालेल्या या विचित्र अपघातामुळे एकच गोंधळ उडाला.
Accident News
Accident NewsSaam tv

Ulhasnagar News: उल्हासनगर मध्ये सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. वरातीत नाचता नाचता 12 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये पोहचले. नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले आहे. लग्न समारंभात झालेल्या या विचित्र अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Accident News
Asaduddin Owaisi on PM Narendra Modi: 'द केरला स्टोरी' सिनेमावरून ओवेसींनी PM मोदींवर साधला निशाणा; म्हणाले...

उल्हासनगर (Ulhasnagar) येथील शांतीनगर भागात असलेल्या प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये एक लग्न होते. यावेळी नवऱ्याचे वऱ्हाड हॉटेलच्या पार्किंग मध्ये पोहोचले असता, नवरदेवाचे वऱ्हाड त्याच्या कारच्या समोर नाचत होते. इतक्यात लग्नात नाचणाऱ्या 12 वऱ्हाड्यांना नवरदेवाच्या कारने चिडल्याची घटना घडली आहे. (Accident News)

या दुर्घटनेत 12 वऱ्हाडी जखमी झाले असून एका जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या रुग्णास मुंबई येथील रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आले असून तर तीन जणांवर उल्हासनगर मधील मीरा एन एक्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Accident News
Nashik News: नाशिकमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे: दादाजी भुसे

तसेच 8 जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जखमींनध्ये बहुतांश महिला आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कार चालकाला अटक केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित आणि झाली नसून, मध्यवर्ती पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com