मुंबईत आपची गुजराती विंग; 'आप'डो गुजराती, 'आप'ली मुंबई

पालिकेत आप आजमावणार नशीब
मुंबईत आपची गुजराती विंग; 'आप'डो गुजराती, 'आप'ली मुंबई
मुंबईत आपची गुजराती विंग; 'आप'डो गुजराती, 'आप'ली मुंबईसुमित सावंत

मुंबई - दिल्लीत आम आदमी पक्षाने दोनदा निवडणूक Election जिंकत इतिहास रचला आहे . त्यानंतर आता देशभरात आपली मुळं रुजवण्यासाठी आप APP पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. सुरत महापालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवल्या नंतर मुंबईत Mumbai आपडो गुजराती Gujrat म्हणत गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुंबई महापालिकांच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशात सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे सारखे छोटेमोठे पक्ष मुंबईत आहेत. या राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत आता दिल्लीत दोनदा सरकार स्थापन करणारं आणि सुरत मध्ये पहिल्याच फटक्यात २७ नगरसेवक निवडून आणणाऱ्या आम आदमी पक्षाकडून मुंबईत नशीब आजमावलं जाणार आहे. आप कडून त्यासाठी मुंबईत मोट बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी आपकडून "गुजराती व्हिंगची" काल सुरुवात करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

मुंबईत एकूण मतदरांपैकी गुजराती समाजाचे २०% मतदार आहेत. यातील मोठा वर्ग भाजपला मतदान करत आला आहे. हा मतदार स्वतःकडे खेचण्याचा आपचा प्रयत्न आहे. कारण गुजरातमधल्या सुरत महानगरपालिकेत २७ नगरसेवक निवडून आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे 'आपडो गुजरातीचा नारा दिला जात आहे.याच बरोबर दिल्लीत मुस्लिम मतदारांनी देखील आपला पूर्ण पाठिंबा देऊन गठ्ठा मतदान केलं होतं. त्यामुळे मुंबईतील मुस्लिम समाज देखील मदत करेल अशी आशा आपला आहे.

मुंबईत आपची गुजराती विंग; 'आप'डो गुजराती, 'आप'ली मुंबई
पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह दोघे गेले वाहून

आप मुंबईच्या निवडणुकीत सुरत मधील नगरसेवकांना उतरवणार असल्याचे निश्‍चित आहे. त्यामुळे गुजराती समाज काही प्रमाणात जरी आप कडे वळल्यास त्याचा फटका भाजपला बसणार. गुजराती समाज हा भाजपचा हक्काचा मतदार आहे. मुस्लिम मतदारांनी आपला साथ दिली आहे. मुंबईतील मुस्लिम मतदारही आप कडे वळाल्यास त्याचा थेट फटका कॉंग्रेसला बसेलच त्याच बरोबर शिवसेनेलाही बसू शकतो. शिवसेना महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने नवी व्होट बॅंक तयार करण्यासाठी गुजराती आणि मुस्लिम मतदारांकडे पाहत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com