27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा - गुलाब वझे

27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा अशी मागणी केली, जेणे करून लोकांच्या समस्या जाणून घेता येतील.
27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा - गुलाब वझे
27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा - गुलाब वझेप्रदीप भगणे

डोंबिवली : आज केडीएमसी मधील 27 गावांतील सर्वपक्षीय संघर्ष समितीने आयुक्तांशी भेट घेत 27 गावांतील समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी 27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा अशी मागणी केली, जेणे करून लोकांच्या समस्या जाणून घेता येतील. (gulab vaze demands to time with kdmc commissioner and officers for 27 villages)

27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट घेतली. यावेळी गावामधील रस्ते, गटारे, स्ट्रीट लाईट, आरोग्य यंत्रणाबाबत समस्या मांडल्या. तसेच 27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा अशी मागणी केली. जेणे करून लोकांच्या समस्या जाणून घेता येतील आणि त्यातून समस्या सुटण्यास मदत होईल.

हे देखील पहा -

याबाबत समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने 2015 साली जबरदस्तीने येथील 27 गावे कडोंमपात समाविष्ट केली आहेत. मात्र 27 गावांतील जनतेला स्वतंत्र नगरपालिका हवी आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मागील कित्येक वर्षांपासून येथील जनतेला किमान पायाभूत सुविधाही पुरविण्यास असमर्थ ठरली आहे. आजतागायत ह्या परिस्थितीत सुधारणा झाली नसून महानगरपालिकेच्या अंमलाखाली आजही येथील जनता पायाभूत सुविधांपासून पूर्णपणे वंचित आहे.

27 गावांसाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह एक दिवस वेळ दयावा - गुलाब वझे
कल्याणमध्ये 36 लाखांची पाणी चोरी; MIDC ने केला गुन्हा दाखल

अशी एकंदरीत परिस्थिती असल्याने हि गावे कडोंमपातून मुक्त करुन स्वतंत्र नगरपालिका मिळावी ह्यासाठी संघर्ष समितीने लढा पुकारला आहे, तरी याला काही काळ लोटला आहे. तरी महापालिकेकडून मूलभूत सोयीसुविधा मिळावी या हेतूने 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट घेतली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com