''शरद पवार यांनी गोळ्या घातल्या तरी विलीनीकरण घेवून राहणार''

आंदोलनाच्या ठिकाणी त्रास दिला जात असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
''शरद पवार यांनी गोळ्या घातल्या तरी विलीनीकरण घेवून राहणार''
''शरद पवार यांनी गोळ्या घातल्या तरी विलीनीकरण घेवून राहणार''Saam Tv

मुंबई : गेल्या 48 दिवसांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वकील गुनरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) ठामपणे उभे आहेत. आज कोर्टात विलीनीकरणाच्या बाबतीत सुनावणी होती, ती उद्यावर ढकलण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने बोलताना वकील सदावर्ते म्हणाले आज आम्ही 48 हजार कर्मचाऱ्यांच्यावतीने प्रतिज्ञा पत्र सादर केलं आहे. सरकारकडून लंगडी बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. पगारवाढ झाल्याचं सांगण्यात आलं. कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे. आंदोलनाच्या ठिकाणी त्रास दिला जात असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

''शरद पवार यांनी गोळ्या घातल्या तरी विलीनीकरण घेवून राहणार''
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी!

मी पाकिस्तानचा कसाब नाही...

पुढे सदावर्ते म्हणाले ''54 मृत्यूनंतर देखील सरकारला काही वाटत नाही. सत्तेत बसलेले लपून आपल्या बेडरूममधून ऐकत असतील. तुम्ही तयार केलेला हा पैलवान कोर्टात लढत होता. सरकारने आज जे केले ते वेदनादायी होते. सरकारला आज विलीनीकरण याबाबत रिपोर्ट सादर करायचा होता. सरकारने ना इधर ना उधर असे केले याला सरकार म्हणत नाही. वारंवार अल्टिमेटम देत आहेत. मी न्यायालयात म्हणालो आम्ही पाकिस्तानी नाहीत हिंदुस्थानी आहोत. न्यायालय म्हणाले तुम्ही संप मागे घेणार की नाही. मी म्हणालो आमचा संप नाही दुखवटा आहे. मी न्यायालयाला म्हणालो मी पाकिस्तानचा कसाब नाही. या सरकारने आझाद मैदान इथले पाणी देखील पळवले हे मी न्यायालयाला सांगितले. मी न्यायालयाला म्हणालो एवढे देखील ताणू नका की हा कर्मचारी आत्महत्या करेल''. सुभाष देसाई यांच्यासोबत बोलणे सुरू असल्याचेही सदावर्ते म्हणाले.

22 तारखनंतर काय?

सरकारचा कुछ तो गोलमाल है असे वाटते. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही विलीनीकरण घेऊन राहणार. मला पत्रकार म्हणाले 22 तारखनंतर काय? मी म्हणालो इंदिरा गांधी यांनी जसे इमर्जन्सी लावली तशी आम्ही अनिल परब यांच्यावर लावू. विलीनीकरणाच्या लढ्यात तुम्ही सर्व जायला तयार आहात का? तुमच्यासोबत काहीच होणार नाही होणार तर फक्त विलीनीकरण होणार. आपण कोणताही मोर्चा आयोजित केलेला नाही. फक्त जिथे आहोत तिथे बसून गजर करायचा आहे. एकही युनियन कामाची राहिलेली नाही. एक 50 लोकांची होती ती देखील आज आली नाही अशी टीका सदावर्ते यांनी युनीयनच्या लोकांवर केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com