उल्हासनगरमध्ये 3 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त!

भिम सेनेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांची कारवाई
उल्हासनगरमध्ये 3 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त!
उल्हासनगरमध्ये 3 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त!अजय दुधाने

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या (Police Station Ulhasnagar) हद्दीत भिम सेनेच्या निकिता राव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३ लाख ९० हजारांचा गुटखा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरमध्ये 3 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त!
नागपूर: तीन भाषांवर प्रभुत्व असणारी उच्चशिक्षित तरुणी निघाली चोर !

शहाड रेल्वे स्टेशन येथील महात्मा फुले चौकात अब्दुल शेख नामक व्यक्तीने एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला होता. याविषयी भिम सेनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे आणि त्यांच्या स्टाफने या गोडाऊनवर धाड टाकली.

हे देखील पहा-

याठिकाणावरून राजगंधा, विमल, गोवा असा अनेक कंपनीचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ह्या गोडाऊनमधून जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ३ लाख ९० हजार आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी सुंदर लक्ष्मण शिन्नू आणि हमीद उर्फ अब्दुल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अब्दुल हा ह्या घटनेनंतर फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. आतापर्यंत अब्दुलच्या विरोधात पोलिसांनी अनेकदा कारवाई करून देखील तो सर्रास गुटखा विक्री करतोय. त्यावर आता कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com