Corona Vaccine: हॅकरपासून सावधान; बुस्टर डोसच्या नावाखाली नागरिकांना गंडा

कोरोना (Corona) बूस्टर डोस घेण्यासाठी आवेदन करत असताना खात्रीशीर वेबसाईटवर जाऊन आवेदन करावं.
Corona Vaccine Update
Corona Vaccine UpdateSaam TV

पुणे : कोरोना साथीचा फायदा घेत सायबर हॅकरनी आता नवा बँकिंग फ्रॉडचा फंडा शोधून काढला आहे. बूस्टर डोस (Booster Dose) नोंदणीच्या फंड्या खाली सायबर बँक हॅकर नागरिकांच्या बँक अकाऊंटपर्यंत पोहोचून थेट गंडा घालत आहेत.  नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर बँक हॅकर नागरिकांच्या मोबाईलवर कोरोना प्रतिकारक बूस्टर डोस घेण्याच्या नावाखाली एक लिंक मेसेज करुन पाठवत आहेत.  या लिंक वर नागरिकांना त्यांची संपूर्ण खासगी माहिती भरण्यासाठी सांगून त्यांच्याकडून बँकेचं ओटीपी नंबर हॅकर जाणून घेत आहेत. 

त्यामुळे कोरोना (Corona) बूस्टर डोस घेण्यासाठी आवेदन करत असताना खात्रीशीर वेबसाईटवर जाऊन आवेदन करावं, WhatsApp किंवा इतर मोबाईलच्या इतर ऍप वर आलेल्या कोणत्याही लींक मेसेजवर क्लिक करून बूस्टर डोस साठी आवेदन करू नये अस आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केल आहे. नागरिक सध्या कोरोना - ओमिक्रॉन (Omicron Variant) साथीच्या दहशती खाली जीवन जगत आहेत, त्यामुळे या साथीपासून आपल्या प्रतिकार करता याव म्हणून काहिजण लवकरात-लवकर बूस्टर डोस मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेत सायबर हॅकर नागरिकांच्या गंडा घालत आहेत, त्यामुळे नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com