Pune Crime: घरफोडी करणाऱ्या टोळीच्या हडपसर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News : या तिघांवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून सोने, चांदीचे दागिनेदेखील जप्त केले आहेत.
Pune Crime News
Pune Crime Newsसचिन जाधव

पुणे: घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या हडपसर (Hadapsar) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील तिघांना हडपसर पोलिसांनी अटक (Arrested) केली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Hadapsar Crime News)

हे देखील पाहा -

या टोळीने ४ घरफोड्या केल्या होत्या. या टोळीतील तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून १७ तोळे सोने आणि ८०० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. सोन, चांदीच्या दागिन्यांसह, एका गाडी असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त हडपसर पोलिसांनी जप्त केला आहे. हे सगळे आरोपी तरुण वयाचे आहेत. अक्षयसिंग जुनी (१९), जितसिंग टाक (२६), लोकसिंग टाक (१९) अशी या आरोपींची नावं आहेत.

Pune Crime News
Jalgaon: रक्षाबंधनाला घेण्यासाठी आलेल्या भावास दिसला बहिणीचा मृतदेह

या तिघांवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून सोने, चांदीचे दागिनेदेखील जप्त केले आहेत. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत. दरम्यान घरफोडी करणाऱ्या या टोळीला जेरबंद केल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com