पुण्यात पाण्यासाठी हंडा मोर्चा!

चेतन मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हंडा मोर्चा
पुण्यात पाण्यासाठी हंडा मोर्चा!
पुण्यात पाण्यासाठी हंडा मोर्चा!सागर आव्हाड

पुणे - पुण्यातील आंबेगाव पठार, आंबेगाव या परिसरातील नागरिकांनी आज धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयवर पाणी मिळत नसल्याने हंडा मोर्चा काढला .गेले चार वर्ष आंबेगाव व आंबेगाव पठार हे गाव पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आहे. सामाविष्ट होऊनही पुरेसं पाणी या भागाला मिळत नाही म्हणून या ठिकाणच्या रहिवाशांनी चेतन मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हंडा मोर्चा काढला.

हे देखील पहा -

जर पुढील दोन महिन्यात पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केले नाही मोठं आंदोलन उभा केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या परिसरात नवीन होणाऱ्या सोसायट्यांना मुबलक पाणी मिळतं मात्र गेल्या काही वर्षापासून आम्ही पाण्यासाठी पाठपुरावा करतोय आम्हाला कमी पाणी मिळत आहे. पाठपुरावा करूनही महानगरपालिका अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत म्हणून चेतन मांगडे व परिसरातील महिलांनी क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com