
कल्याण : कल्याणमधील एका तरूणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, एका मुलीच्या मदतीने, ७ तरुणांनी पीडीतेवर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणांच्या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांना मुलीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाली असून कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याबाबत कोळसेवाडी पोलिसचे सिनियर PI बशीर शेख यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही दरम्यान, आरोपींमध्ये एका तरुणीचा देखील समावेश असून ही आरोपी तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती अशी माहिती पोलीस (Police) सूत्रांनी दिली आहे.
हे देखील पाहा -
याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपींमध्ये कल्याणधील (Kalyan) एका नामांकीत बिल्डरची मुलं असून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे,आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या मुलीने बारावीची परीक्षा दिली होती नुकताच तिचा निकालही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला ७१ टक्के गुण देखील मिळाले होते. आत्महत्ये प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासा दरम्यान मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली.
या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. सुसाईड नोटमधील मजकुरामुळे पोलिस ही थक्क झाले. सदर मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुणांनी व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली. तसंच धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमाना एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती.
ही तरुणी पिडीतेची मैत्रीण होती.पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. दररम्यान, अटक केलेल्या आरोपींमधील काही कल्याणमधील मोठ्या बिल्डरांची मुलं असल्याची माहिती समोर येत आहे .
आरोपींमध्ये मोठ्या बिल्डरची मुलं -
याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे, तिला ढकललं की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांनी करावा, तिला ब्लॅकमेल केलं जात होतं, कल्याण मधील एका मोठ्या बिल्डरची मुलं यात सहभागी आहे. आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी , बिल्डरकडून आमच्यावर देखील दबाव आणला जात आहे ,आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला देखील पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.