भाजपात का गेला? हर्षवर्धन पाटलांच्या उत्तराने हास्यकल्लाेळ

भाजपात का गेला? हर्षवर्धन पाटलांच्या उत्तराने हास्यकल्लाेळ
harshvardhan patil

मावळ : भाजपमध्ये मी मस्त अन निवांत आहे, मला शांत झोप लागते. माझी कोणती चौकशी ही सुरू नाही असे मिश्किलपणे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी एका कार्यक्रमात म्हणताच उपस्थितांनी हसत हसतच टाळ्या वाजवित त्यांच्या वक्तव्यास प्रतिसाद दिला. मावळ तालुक्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आले हाेते. त्यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

व्यासपीठावरील एकाने हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही भाजपात का गेला असा प्रश्न केला. त्यावर पाटील यांनी हे तुम्ही तुमच्या साहेबांना विचारा असे उत्तर दिले. त्यावर संबंधित व्यक्तीने तेवढं सोडून बोला असे म्हटणताच पाटील यांनी मी पण त्यांना सांगितलं की तेवढं सोडून विचारा असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

हर्षवर्धन पाटील यांनी हा किस्सा व्यासपीठावर सांगताना आम्हांला सुद्धा भाजपात जायला लागेल. आता तिथे मी मस्त आहे अन निवांत आहे. शांत झोप लागते. काही नाही चौकशी नाही, काही नाही बघा. पाटील यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.