Mumbai News : पुरणपाेळी आणायला घराबाहेर पडला अन् परतलाच नाही; धुलिवंदनाच्या दिवशी कुटुंबियांना मोठा धक्का

Vileparle News : घडलेला प्रकार समजल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

संजय गडदे

Mumbai News in Marathi : मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी होळीच्या दिवशी कुटुंबीयांसाठी रेडिमेड पुरणपोळी घेऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला 40 वर्षीय पुन्हा घरी परतलाच नाही. (Latest Marathi News)

Mumbai News
Nashik Accident : दिव्यांग महिलेला बसची जोरदार धडक; लांबवर नेलं फरफटत

रस्त्यावर एकमेकांवर फुगे फेकणाऱ्या तरुणांच्या हुललडबाजीपणामुळे त्या तरुणाच्या डोक्याला पाण्याने भरलेला फुगा लागल्यामुळे तो तरुण जागीच कोसळला आणि त्यात त्याचा जीव गेल्याची दुःखद घटना घडली आहे. दिलीप धावडे अस त्या मृत तरुणाचे नाव आहे. घडलेला प्रकार समजल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मुंबईच्या (Mumbai) विलेपार्ले पूर्वेकडील शिवाजीनगर भागात सिद्धिविनायक सोसायटीमध्ये दिलीप धावडे आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसाठी दुकानातून रेडिमेड पुरणपोळी घेऊन येत ही घटना घडली आहे.

रस्त्यावरील दोन गट पाण्याने भरलेल्या पिशव्यांचे फुगे एकमेकावर फेकत असताना रस्त्यावरील तरुणांनी फेकलेला फुगा दिलीप धावडे यांच्या डोक्याला लागतात ते जमिनीवर यातच ते बेशुद्ध झाले.

Mumbai News
Satara News: झुकेगा नहीं साला ! डायलॉगबाजीने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या उदयनराजेंच्या भूमिकेकडे लागलं लक्ष

शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला मात्र ते उठले नाही म्हणून त्यांना नागरिकांनी विलेपार्ले पश्चिमेकडील उपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी ADR दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. दिलीप धावडे हा तरूण एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये काम करतो. मात्र त्यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी दर्शिका आणि 12 वर्षीय मुलगी स्वरा आणि 7 वर्षीय मुलगा गौरेश यांचे छत्र हरपले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com