जिमखाना येथील दुचाकी घेऊन चोरटा झाला पसार, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
जिमखाना येथील दुचाकी घेऊन चोरटा झाला पसार, घटना सीसीटीव्ही मध्ये कैदप्रदीप भणगे

जिमखाना येथील दुचाकी घेऊन चोरटा झाला पसार, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

बॅडमिंटन खेळण्याच्या उत्साहामध्ये दुचाकींला चावी गाडीलाच लावून ठेवणे, वाहन चालकाला चांगलेच महागात पडले आहे.

डोंबिवली : बॅडमिंटन Badminton खेळण्याच्या उत्साहामध्ये दुचाकींला चावी key गाडीलाच लावून ठेवणे, वाहन चालकाला चांगलेच महागात पडले आहे. डोंबिवलीच्या Dombivli जिमखाम gym khana परिसरातून एका खेळाडूची दुचाकींच चोरट्याने लंपास केली आहे. वाहन चोरी झाल्याचे लक्षात येताच, वाहनचालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. He took a bike from the gym khana and passed out

मात्र, वाहनाला चावी विसरण चालकाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. हा सर्व प्रकार आता सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. डोंबिवलीच्या जिमखाना मध्ये बॅडमिंटन खेळण्यासाठी डोंबिवली मध्ये राहणारे ऋषिकेश भागवत हे गेले होते. बॅडमिंटन खेळत असताना त्यांनी तहान लागली, म्हणून गाडीच्या डिक्की मधून पाण्याची बाटली आणि रुमाल काढले आहे.

हे देखील पहा-

मात्र, याच दरम्यान गाडीच्या डिक्कीला लावलेली चावी ते काढण्यास विसरले आणि गाडीवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्याने आपले चोरीचे काम करुन हात साफ करुन घेतले आहे. 50 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस TVS कंपनीची इंटर्क मोटरसायकल घेऊन चोरट्याने पोबारा केला आहे. ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही CCTV मध्ये कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. He took a bike from the gym khana and passed out

जिमखाना येथील दुचाकी घेऊन चोरटा झाला पसार, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरटा जेरबंद

वाहनचालकाची एक छोटीशी चुकी ही त्याच्या किती अंगलट आलेली दिसते हे याचं उदाहरण आहे. यामुळे वाहन चालवताना, डोंबिवलीकरांनी वाहनाची चावी वाहनाला न ठेवता आपल्या जवळ ठेवण अत्यंत आवश्यक झाला आहे. डोंबिवली काही दिवसांपासून चोरट्यांनी हैदोस घातला आहे, यामुळे आता चोराचा शोध घेण्याचे आवाहन मानपाडा पोलिसांसमोर उघडले आहे. यामुळे आता बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंची चोरीला गेलेली दुचाकी कधी मिळणार का हे पाहावे लागेल.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com