Shivsena News: शिवसेना कोणाची? वकिलांमध्येच शाब्दिक चकमक,निवडणूक आयोगासमोर झाला वाद; पाहा नेमकं काय झाल?

आयोगासमोर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची बातमी समोर येत आहे.
shivsena news
shivsena news saam tv

Mumbai News: शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निकाल काय निकाल देतो याकडे अनेकांचं लक्ष आहे. दोन्ही पक्षांच्या वकिलांंकडून याबद्दल जोरदार युक्तीवाद सुरू आहे.

संपूर्ण खटल्याचा ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तीवाद करत आहेत, तर शिंदे गटाच्या वतीने अँड महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत. मात्र आयोगासमोर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची बातमी समोर येत आहे. (Shivsena)

shivsena news
Maharashtra Politics : CM शिंदेंचं ते वाक्य ठाकरे गटाने हेरलं; निवडणूक आयोगासमोर VIDEO क्लिप दाखवणार!

याबाबत अधिक माहिती अशी की, युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? असा प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला.

कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली. ज्यानंतर वाद निवळला आणि पुन्हा सुणावनीला सुरूवात झाली आहे. (Election Comission)

shivsena news
Pankaja Munde: 'बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये..' पंकजा मुंडेंचा थेट पक्षाला इशारा, फडणवीसांवर हल्लाबोल

दरम्यान, शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य, प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच, मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com