...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा सुरु

डॉ. वीरेंद्र वर्मा यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने हायपोथर्मिया उपचारासह अभिनव व्यवस्थापनाच्या सहाय्याने नवजात बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्ववत केले आहे.
...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा सुरु
...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा सुरुSaam Tv

मुंबई - मीरारोड येथील एका खाजगी रूग्णालयातील डॉक्टरांना जन्मतः हृदयाचे ठोके बंद पडलेल्या एका नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. डॉ. वीरेंद्र वर्मा यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने हायपोथर्मिया उपचारासह अभिनव व्यवस्थापनाच्या सहाय्याने नवजात बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्ववत केले आहे.

हे देखील पहा -

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. जन्मावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनप्रक्रिया सामान्यरित्या होत नसल्याने जन्मल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांतच ते सुरळीत करण्यात डाँक्टरांच्या चमूला यश आले.

...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा सुरु
मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयारच नाही - देवेंद्र फडणवीस

आम्ही या नवजात बाळावर हायपोथर्मियाची पद्धत अवलंबविण्याचा प्रयत्न केला. तत्पुर्वी बाळाच्या पालकांना त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याविषयी माहिती देण्यात आली होती. या उपचारामध्ये बाळाला मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेंटीग्रेड कमी तापमानात ठेवण्यात आले. ज्यामुळे बाळाच्या मेंदूमधील इजा कमी होण्यास मदत झाली. या प्रक्रियेत ७२ तासांपर्यंत उपचारात्मक हायपोथर्मिया देण्यात आले. १० मिनिटांच्या आत मुलाला काही विशेष औषध देण्यात आले. त्यानंतर या नवजात बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला लागले. आता बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती नवजात शिशू तज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com