पुढील काही तासांत मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा पावसाने राज्यात पुनरागमन केले आहे.
पुढील काही तासांत मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
पुढील काही तासांत मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यताSaam Tv

मुंबई - गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने Rain राज्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. काल ३१ ऑगस्ट २०२१ रोजी कोकण, मराठवाड्यासह अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा पावसाने राज्यात पुनरागमन केले आहे.

हे देखील पहा -

मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात आज १ सप्टेंबर २०२१ रोजी देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे. महाराष्टात काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ह आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात तीव्र ढग जमा झाल्याने मुंबईसह, अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे आज १ सप्टेंबर २०२१ रोजी धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील काही तासांत मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
LPG सिलेंडरचा दर पुन्हा भडकला; 15 दिवसात 50 रुपयांनी वाढ

पुढील काही तासांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com