Pune Rain : पुण्यासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे; घराबाहेर न पडण्याचा सल्ला, शाळा-कॉलेजला सुट्टी

पुणे जिल्ह्यात 14 आणि 16 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
Pune Mulshi Rain Update News
Pune Mulshi Rain Update NewsSAAM TV

पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुण्यात (Pune) मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आता पुढच्या 48 तासांत अतिवृष्टीचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 14 ते 16 जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Pune Rain Latest News)

Pune Mulshi Rain Update News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ; पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, जाणून घ्या काय आहे कारण ?

प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात 14 आणि 16 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Pune Monsoon Live Updates)

Pune Mulshi Rain Update News
धक्कादायक! एका महिलेसह २४ कैद्यांना HIV ने गाठलं; कारागृह प्रशासन हादरलं

पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू

येत्या 48 तासांत पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच घाट माथ्याच्या परिसरास रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्याच्या ठिकाणी पुढील काही दिवस जाऊ नये, असे वेधशाळेने म्हटले आहे. हीच बाब लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळावर कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

सिंहगड, लोहगड, विसापूर, राजगड, तोरणा किल्ले यासह इतर गडांवर 144 कलम लागू करण्यात आलं आहे. याशिवाय अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, पानशेत धरण परिसरात सुद्धा कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com